Posts

एक विदारक दृश्य...

Image
           सर्व जग ज्याठिकाणी कोरोना सारख्या मोठ्या संकटाला सामोरे जात असताना अचानक एक बातमी येते की,  एका हत्तिणीला अननस मधून फटाक्याची दारू चारली आणि त्या दारूचा इतका वाईट परिणाम झाला की त्या हत्तीनीच्या ते जबड्यात अडकून राहिली आणि कालांतराने तिचा जबडा फाटला आणि तडफडून तडफडून दोन दिवसानंतर तिने एका नदीमध्ये आपला प्राण सोडला.         हत्तीसारखा प्राणी जो कधीच कुणाला हानी पोहचवत नाही आणि त्याच्यावर असे क्रूर कृत्य होते आणि विशेष म्हणजे ती हत्तीण गरोदर असताना....          काय दोष होता त्या हत्तिणीचा ? काय दोष होता त्या अभ्रकाचा ज्याने अजुन या जगात पाऊलच ठेवलेले नव्हते...          आणि एवढं घडूनही त्या हत्तीनिने कुणावरही हल्ला केला नाही की कुणाला त्रास दिला नाही. यावरून तरी हेच समजते की प्राणी हे मानवासाठी किती प्रेम दर्शवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला काय वाईट माणसे असे कृत्य करून मानव जातीची मान खाली झुकवत आहेत....          अशा घटना पहाताना तळपायाची आग मस्तकात ज...